कोलकाता : पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी मंत्रिमंडळात खातेवाटप केले. वरिष्ठ नेते दिलीप घोष यांना पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाचा कार्यभार देण्यात आला अाहे. अग्निमित्रा पॉल यांना महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभाग खाते देण्यात आले, तर अशोक किर्तनिया यांच्याकडे अन्न व पुरवठा आणि सहकार विभाग सोपवण्यात आला आहे. क्षुदिराम टुडू यांना आदिवासी विकास, मागासवर्गीय कल्याण विभागाचे मंत्री करण्यात आले आहे. निसिथ प्रामाणिक यांच्याकडे क्रीडा खाते सोपवले आहे.









