भिंत कोसळूनदोन मुले ठार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जालना जिल्ह्यातील अंबड तालुक्यातील घुंगर्डे हादगाव येथे दुर्दैवी घटना घडली. पडीक घराची भिंत कोसळल्याने शौर्य गोरख कासार आणि चैतन्य राधाकिसन भिसे या दोन बालकांचा जागीच मृत्यू झाला. भिसे हा मामाच्या गावी आला होता. दोघेही भिंतीजवळ खेळत असताना हा अपघात झाला. या घटनेने गावात शोककळा पसरली आहे. ग्रामस्थांनी जीर्ण इमारतींची पाहणी करण्याची मागणी केली आहे.

भिंत कोसळूनदोन मुले ठार

जालना : घुंगर्डे हादगाव (ता. अंबड) येथे शुक्रवारी दुपारी पडक्या घराची भिंत अंगावर कोसळल्याने शौर्य गोरख कासार (रा. हादगाव) व चैतन्य राधाकिसन भिसे (रा. मारफळा, ता. गेवराई, जि. बीड) ही दोन मुले जागीच ठार झाली.

भिसे हा मामाच्या गावी आला होता. दुपारच्या सुमारास दोघेही गावालगत असलेल्या पडीक घराच्या भिंतीजवळ खेळत असताना जुनी झालेली भिंत अंगावर कोसळून दोघांचाही जागेवर मृत्यू झाला. यामुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

जीर्ण व पडीक इमारतींमुळे होणाऱ्या अपघाताचा धोका लक्षात घेऊन अशा इमारतींची तातडीने पाहणी करून आवश्यक ती कार्यवाही करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे.