कोलकाता : पश्चिम बंगालचे नवे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांनी सोमवारी मंत्रिमंडळात खातेवाटप केले. मंत्रिमंडळात पाच मंत्री आहेत.
भाजपचे वरिष्ठ नेते दिलीप घोष यांना पंचायत आणि ग्रामीण विकास विभागाचा कार्यभार देण्यात आला असून, त्यांच्याकडे पशुसंवर्धन विकास आणि कृषी विपणन विभागही सोपविण्यात आला आहे. अग्निमित्रा पॉल यांना महिला व बालविकास आणि समाजकल्याण विभाग तसेच नगरपालिका व्यवहार खाते देण्यात आले, तर अशोक किर्तनिया यांच्याकडे अन्न व पुरवठा आणि सहकार विभाग सोपविण्यात आले आहे. क्षुदिराम टुडू यांना आदिवासी विकास, मागासवर्गीय कल्याण, अल्पसंख्याक व्यवहार आणि मदरसा शिक्षण विभागाचे मंत्री करण्यात आले.







