मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

केरळ विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मोठे यश मिळाले आहे. मात्र, मुख्यमंत्रिपदाचा तिढा अजून सुटलेला नाही. पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधला आहे. अनेक प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे. नेतृत्वाच्या निवडीवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी बैठका होत आहेत. मुख्यमंत्रिपदासाठी तीन नेते मोर्चेबांधणी करत आहेत. या तिन्ही नेत्यांनी दिल्लीत पक्ष नेतृत्वाची भेट घेतली.

मुख्यमंत्रिपदाचा तिढा कायम

विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवूनही काँग्रेसकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत अनिश्चितता कायम आहे. पक्षश्रेष्ठींनी केरळमधील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, चर्चेसाठी अनेक प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. केरळ काँग्रेसच्या माजी अध्यक्षांना राजधानीत उपस्थित राहण्यास सांगण्यात आल्याचे समजते. तर, ज्येष्ठ नेते के. सुधाकरन हे सोमवारी रात्री दिल्लीत दाखल होण्याची शक्यता आहे.

काँग्रेस नेते के. मुरलीधरन आणि मुल्लापल्ली रामचंद्रन यांच्यासह इतर नेत्यांशीही सोमवारी दिवसभरात संपर्क साधण्यात आला. नेतृत्वाच्या निवडीवरून निर्माण झालेला तिढा सोडवण्यावर या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. ज्येष्ठ नेते रमेश चेन्नीथला, सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल आणि विरोधी पक्षनेते व्ही. डी. सतीशन हे तीन नेते राज्याच्या मुख्यमंत्रिपदासाठी मोर्चेबांधणी करत आहेत. पक्षाच्या शीर्षस्थ नेतृत्वाने शनिवारी नवी दिल्ली येथे या तिन्ही नेत्यांची भेट घेतली.