चीनचे अध्यक्ष शि जिनपिंग यांच्या निमंत्रणावरून अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प १३ ते १५ मेदरम्यान चीनच्या दौऱ्यावर जाणार आहेत. चीनच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सोमवारी ही माहिती दिली.
या दौऱ्यात दोन्ही नेत्यांमध्ये तैवानच्या मुद्द्यासह इराण युद्ध आणि त्यासोबतच टेरिफ, एआय चिप नियमन आणि महत्त्वपूर्ण खनिजे यांसारख्या आर्थिक मुद्द्यांवर चर्चा होण्याची अपेक्षा आहे. जवळपास नऊ वर्षांत अमेरिकेच्या अध्यक्षांचा हा पहिलाच चीन दौरा असेल. यापूर्वी २०१७मध्ये चीनला भेट देणारे ट्रम्प हेच शेवटचे अमेरिकी अध्यक्ष होते.






