भरती घोटाळा;माजी मंत्री अटकेत

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम बंगालमध्ये दोन मोठ्या घटना घडल्या आहेत. नगरपालिका भरती घोटाळ्याप्रकरणी माजी मंत्री सुजित बोस यांना अटक झाली आहे. तसेच, मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांच्या सहकाऱ्याच्या हत्येप्रकरणी उत्तर प्रदेशातून तिघांना ताब्यात घेतले आहे. या दोन्ही प्रकरणांचा तपास सुरू आहे. या घटनांमुळे राज्यात खळबळ उडाली आहे.

former minister sujit bose arrested in money laundering case

कोलकाता : नगरपालिका भरती घोटाळ्याशी संबंधित एका मनी लाँड्रिंग प्रकरणात, सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) सोमवारी पश्चिम बंगालचे माजी मंत्री आणि तृणमूल काँग्रेसचे नेते सुजित बोस यांना अटक केली. सॉल्ट लेकमधील ‘सीजीओ कॉम्प्लेक्स’ कार्यालयात दिवसभर चौकशी केल्यानंतर केंद्रीय तपास यंत्रणेने बोस (६३) यांना ताब्यात घेतले.

शुभेंदूंच्या सहकाऱ्याची

हत्या; तिघांना अटक

पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी यांचे सहकारी चंद्रनाथ रथ यांच्या हत्या प्रकरणातील तीन आरोपींना विशेष तपास पथकाने (एसआयटी) उत्तर प्रदेशमधून अटक केली आहे. या हत्येचा कट रचण्यात आणि तो प्रत्यक्षात आणण्यात किमान आठ जणांचा सहभाग होता.