भाजप नेते हिमंता बिस्व सरमा सलग दुसऱ्यांदा आसामचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्यासाठी सज्ज झाले आहेत. आज, मंगळवारी होणाऱ्या सोहळ्याने राज्यात भाजपप्रणित ‘एनडीए’ सरकारचा सलग तिसरा कार्यकाळ सुरू होत आहे. गुवाहाटीच्या खानपारा येथील पशुवैद्यकीय महाविद्यालय मैदानावर होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय मंत्री सर्वानंद सोनोवाल आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांची उपस्थिती अपेक्षित आहे.






