नवी दिल्ली : अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पश्चिम आशिया शांतता प्रस्ताव इराणने फेटाळल्यानंतर कच्च्या तेलाचा भडका उडाला. याचा परिणाम म्हणून सोमवारी रुपया अमेरिकी डॉलरच्या तुलनेत ८२ पैशांनी कोसळला. एका डॉलरसाठी ९५ रुपये ३१ पैसे मोजावे लागले.
परकी चलन व्यापाऱ्यांच्या मते, डॉलर मजबूत होणे आणि परकी भांडवलाचा मोठ्या प्रमाणावर ओघ बाहेर जाणे यामुळे रुपयावर अतिरिक्त दबाव आला. आंतरबँक परकी चलन बाजारात रुपया ९४.९७वर उघडला. त्यानंतर तो ९४.८७ ते ९५.३४ यामध्ये हिंदोळत राहिला. अखेरीस मागील बंद भावापेक्षा ८२ पैशांनी घसरून ९५.३१ या ऐतिहासिक नीचांकावर बंद झाला.









