‘घेराव प्रकरणातील चौकशी दोन महिन्यांत पूर्ण करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम बंगालमधील मालदा जिल्ह्यात १ एप्रिल रोजी झालेल्या घटनेत सात न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तास डांबून ठेवले होते. या प्रकरणाचा तपास दोन महिन्यांत पूर्ण करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय तपास यंत्रणेला (एनआयए) दिले आहेत. तपासाची सद्यस्थिती काय आहे, अशी विचारणाही खंडपीठाने केली आहे. या गंभीर घटनेवर आता एनआयए लक्ष केंद्रित करणार आहे.

investigation of siege case ordered by supreme court

नवी दिल्ली : पश्चिम बंगालच्या मालदा जिल्ह्यात १ एप्रिल रोजी झालेल्या हिंसाचारादरम्यान एका जमावाने सात न्यायिक अधिकाऱ्यांना नऊ तास डांबून ठेवल्याच्या प्रकरणाचा तपास दोन महिन्यांच्या आत पूर्ण करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी एनआयएला दिले. ‘तपासाची सद्यस्थिती काय आहे?’, अशी विचारणा खंडपीठाने केली.