हल्ले करण्याचे ‘आयएस’चे कारस्थान

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

इस्लामिक स्टेट (आयएस) आता भारताच्या शेजारील देशांतील कट्टरपंथींचा वापर हल्ल्यांसाठी करणार आहे. २०१३ पासून अनेक भारतीय आयएसमध्ये सामील झाले होते, पण आता सुरक्षा यंत्रणांनी त्यांना रोखले आहे. मात्र, आता इतर देशांतील लोकांना भारतात घुसविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंकेत आयएसचे स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत.

isiss new attack threat from radical elements near india

‘इस्लामिक स्टेट’ने ( आयएस ) एक नवी रणनीती आखली असून, त्यानुसार भारताच्या आसपासच्या विविध देशांतील कट्टरपंथींचा वापर प्रचार आणि हल्ले करण्यासाठी केला जाणार आहे. सन २०१३च्या सुरुवातीला या संघटनेने स्वतःची घोषणा केली, तेव्हा भारतातून अनेक जण यात सामील होण्यासाठी गेले. मात्र, गेल्या काही वर्षांत सुरक्षा यंत्रणांनी सीरिया, इराक आणि अफगाणमधील ‘आयएस’मध्ये सामील होण्यासाठी देश सोडून जाणाऱ्या अनेकांना रोखण्यात आले आहे.

‘भारतात ही समस्या मोठ्या प्रमाणात नियंत्रणात असली तरी आता इतर देशांतून भरती केलेल्यांना आत घुसवण्याचे प्रयत्न सुरू आहेत’, असे गुप्तचर विभागाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले. ‘आयएस’चे पाकिस्तान, बांगलादेश, मालदीव आणि श्रीलंकेत स्वतंत्र विभाग कार्यरत आहेत.