१४५९ साली आजच्याच दिवशी मारवाडचे राठोड शासक राव जोधा यांनी जोधपूरची स्थापना केली. सुरक्षेच्या कारणास्तव त्यांनी जुनी राजधानी मंदोर सोडून ‘चिडियाटूंक’ टेकडीवर एक नवीन शहर आणि भव्य मेहरानगड किल्ला बांधला. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण राजपूत स्थापत्यकलेमुळे; तसेच जुन्या शहरातील निळी घरे आणि वर्षभराच्या सूर्यप्रकाशामुळे हे शहर जगभरात ‘ब्लू सिटी’ आणि ‘सन सिटी’ म्हणून ओळखले जाते.
व्हायरल बातमी
बिहारमध्ये एटीएम बनले सलून!
बिहारमधील दानापूर येथील एका एटीएममध्ये सलून सुरू असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. बँकेने एटीएम मशिन काढल्यावर त्या रिकाम्या केबिनचे केशकर्तनालयात रूपांतर झाले आहे. लोक गंमतीने याला बँक न म्हणता ‘पैसे काढण्याचे केंद्र’ म्हणत आहेत.



