लष्कराचे कमांडर लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी बुधवारी जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्याच्या घनदाट जंगलात सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेचा आढावा घेतला आणि चर्चा केली.
या भागात ‘ ऑपरेशन शेरुवाली ’ पाच दिवसांपासून सुरू आहे. जम्मू-काश्मिरातील राजौरी जिल्ह्याच्या घनदाट जंगलात लपलेल्या असल्याचा संशय असलेल्या सूत्रधारांचा माग काढण्यासाठी ही मोहीम सुरू करण्यात आली. असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
सूत्रधारांना हुसकावून लावण्यासाठीच्या तीव्र प्रयत्नांदरम्यान लष्कराने मनजाकोटे परिसरातील दोरीमाल-गंभीर मोघला पट्ट्यातील संशयित आश्रयस्थानांवर विशेष दलांकडून हल्ले केले, असे ते म्हणाले. लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांनी ऑपरेशन शेरुवालीचा आढावा घेतला, असे उत्तर कमांडने ‘एक्स’वर म्हटले.
प्रतिनिधींशी संवाद
लष्कर कमांडरांनी स्थानिक लष्करी तुकड्या, पोलिस, इंटेलिजन्स ब्यूरो, सीआरपीएफ आणि इतर भागधारकांच्या प्रतिनिधींशी संवाद साधला. त्यांनी परिसरात तैनात जवानांशीही संवाद साधला आणि कठीण वातावरणात काम करताना त्यांच्या अथक निर्धाराची, उच्च मनोबलाची आणि दृढ बांधिलकीची प्रशंसा केली.




