‘इंधनदरांमुळे वाढतेयई-बाइकची मागणी’

महाराष्ट्र टाइम्स

वाढत्या इंधनदरांमुळे ई-बाईकची मागणी वाढली आहे. पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांतून मागणी येत आहे. ओबन इलेक्ट्रिक व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड राज्यात २५ शोरूम उघडणार आहे. ग्राहकांना स्टायलिश, दमदार आणि अधिक मायलेज देणाऱ्या ई-बाईक हव्या आहेत. आगामी काळात या क्षेत्राला चांगले दिवस येतील.

fuel prices driving up demand for e bikes sales surge in pune

‘वाढत्या इंधनदरांच्या पार्श्वभूमीवर राज्यातून विशेषत: पुणे , नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, लातूर, नागपूर आणि सोलापूर या शहरांतून इलेक्ट्रिक बाइकची मागणी वाढत आहे. आमच्या आजवरच्या एकूण बाइकविक्रीपैकी २५ टक्के विक्री एकट्या पुणे जिल्ह्यातून झाली आहे. आर्थिक वर्ष २०२७पर्यंत राज्यात एकूण २५ शोरूम उघडण्याची आमची योजना आहे,’ अशी माहिती ‘ ओबन इलेक्ट्रिक व्हेइकल प्रायव्हेट लिमिटेड’चे उपाध्यक्ष (विक्री) हर्षवर्धन देशमुख यांनी दिली.

‘कंपनीची सध्या राज्यात ११ शोरूम कार्यरत असून, आणखी १४ची त्यात भर टाकण्यात येणार आहे. पूर्वी केवळ बॅटरीवर चालणारे वाहन इतकीच ईव्हींची ओळख मर्यादित होती. मात्र, आता ग्राहकांकडून त्यामध्ये स्टायलिश, दमदार आणि अधिक मायलेज देणाऱ्या वाहनांची मागणी होत आहे. त्यामुळे आगामी काळात या क्षेत्राला सुगीचे दिवस येण्याची शक्यता आहे,’ असेही देशमुख यांनी नमूद केले. देशमुख यांच्या हस्ते ‘ओबन’ची ‘रोअर इव्हो’ ही ई-बाइक सादर करण्यात आली.

सध्या कंपनीची १८ राज्यांतील १०० हून अधिक शहरांमध्ये १५० पेक्षा जास्त शोरूम आणि सेवा केंद्रे कार्यरत आहेत. चालू आर्थिक वर्षाच्या अखेरपर्यंत आणखी ५० शोरूम उघडण्याची कंपनीची योजना असल्याचे देशमुख यांनी नमूद केले. ‘शहरात राहणारा तरुणवर्ग प्रामुख्याने ई-बाइकच्या प्रेमात आहे. त्यामुळे त्यांच्या आवडीनिवडी लक्षात घेऊन दणकट आणि अधिक मायलेज देणाऱ्या बाइकच्या निर्मितीवर आमचा भर आहे,’ असेही देशमुख म्हणाले.

कंपनीचा उत्पादन प्रकल्प बेंगळुरूमध्ये असून, वार्षिक बाइकनिर्मिती क्षमता एक लाखांच्या आसपास आहे.