शांतता कराराची पाकला आशा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार लवकरच अंतिम होईल अशी आशा व्यक्त केली आहे. या करारामुळे इराण आणि संपूर्ण प्रदेशाला फायदा होईल असे त्यांचे म्हणणे आहे. त्यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधला. हा करार दोन्ही देशांसाठी आणि प्रादेशिक शांततेसाठी महत्त्वाचा ठरू शकतो.

pakistan expresses hope for peace treaty with india

इस्लामाबाद : अमेरिका आणि इराण यांच्यातील शांतता करार लवकरच अंतिम होईल आणि त्याचा इराण; तसेच संपूर्ण प्रदेशाला फायदा होईल, अशी आशा पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी बुधवारी व्यक्त केली.

पाकिस्तानच्या पंतप्रधान कार्यालयाच्या निवेदनानुसार, शाहबाज यांनी इराणचे राष्ट्राध्यक्ष पेझेश्कियान यांच्याशी दूरध्वनीवर संवाद साधताना हे विधान केले.