नवी दिल्ली : अंतरिम व्यापार कराराचा तपशील निश्चित करण्यासाठी, बाजारपेठ प्रवेश, बिगर टेरिफ उपाय आणि सीमाशुल्क सुलभता आदी महत्त्वाच्या विषयांवरील व्यापक द्विपक्षीय व्यापार करारांतर्गत चर्चा पुढे नेण्यासाठी अमेरिकेचे पथक एक ते चार जून दरम्यान भारताला भेट देणार आहे, अशी माहिती सरकारी अधिकाऱ्याने बुधवारी दिली. हा करार झाल्यास भारतीय वस्तूंना अमेरिकेची मोठा बाजारपेठ उपलब्ध होणार आहे.
ह्युंदाईच्या कार महाग
नवी दिल्ली : ह्युंदाई मोटर इंडिया लिमिटेडतर्फे मॉडेल आणि प्रकारांनुसार कारच्या किमतींमध्ये १२,८०० रुपयांपर्यंत वाढ करण्यात येणार आहे. ही वाढ एक जूनपासून लागू होणार आहे. उत्पादन खर्चात झालेल्या वाढीमुळे दरवाढ करण्यात आल्याचे कंपनीने सांगितले. विविध खर्च वाढल्याचा हवाला देऊन सर्व कारच्या किमतींत एक टक्का वाढ करण्याची घोषणा कंपनीने केली होती.
उत्पादन वाढणार
नवी दिल्ली : अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे काही भागांत झालेल्या नुकसानीनंतरही, देशातील गव्हाचे उत्पादन २०२५-२६ या पीक वर्षासाठी (जुलै-जून) २.२९ टक्क्यांनी वाढून १२०.६५ दशलक्ष टनांवर जाण्याचा अंदाज आहे, अशी माहिती बुधवारी केंद्र सरकारने दिली. हा अंदाज १२०.२१ दशलक्ष टनाच्या अंदाजाशी सुसंगत आहे.




