‘आयटीआर-२’ अर्ज भरण्याची सुविधा सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयटीआर-२ अर्ज आता ई-फायलिंग पोर्टलवर ऑनलाइन भरता येणार आहे. कर आकारणी वर्ष २०२६-२७साठी ही सुविधा सुरू झाली आहे. ज्यांचे व्यवसाय किंवा पेशातून उत्पन्न नाही, पण भांडवली नफ्यातून उत्पन्न मिळते, अशांसाठी हा अर्ज आहे. यापूर्वी आयटीआर-१ आणि आयटीआर-४ अर्जही सुरू झाले होते. वैयक्तिक करदात्यांसाठी आयटीआर-१ आणि आयटीआर-२ भरण्याची अंतिम मुदत ३१ जुलै आहे.

itr 2 filing facility now available

प्राप्तिकर विभागाने बुधवारी ‘ ई-फायलिंग पोर्टल’वर कर आकारणी वर्ष २०२६-२७साठी, अर्थात करवर्ष २०२५-२६साठी ‘आयटीआर-२’ हा विवरण अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा सुरू केली.

प्राप्तिकर विभागाने ‘एक्स’वरील पोस्टमध्ये म्हटले, की ‘आयटीआर-२’ ऑनलाइन भरण्याची सुविधा आणि ‘एक्सेल युटिलिटी’ आता ई-फायलिंग पोर्टलवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ज्यांचे व्यवसाय किंवा पेशातून कोणतेही उत्पन्न नाही; परंतु ज्यांना भांडवली नफ्यातून उत्पन्न मिळते, अशा व्यक्ती आणि हिंदू अविभक्त कुटुंबांद्वारे (एचयूएफ) ‘आयटीआर-२’ भरला जातो. प्राप्तिकर विभागाने यापूर्वी १५ मे रोजी लहान आणि मध्यम करदात्यांकडून भरले जाणारे ‘आयटीआर-१’ आणि ‘आयटीआर-४’ हे अर्ज ऑनलाइन भरण्याची सुविधा कर आकारणी वर्ष २०२६-२७साठी सुरू केली होती.

आर्थिक वर्ष २०२५-२६मध्ये मिळवलेल्या उत्पन्नाचा प्राप्तिकर परतावा घेण्यासाठी हे अर्ज ३० मार्च रोजी अधिसूचित करण्यात आले होते. आता ऑनलाइन फायलिंग आणि एक्सेल युटिलिटी सुरू झाल्यामुळे, करदाते त्यांचा परतावा भरण्यास सुरुवात करू शकतील. वैयक्तिक करदात्यांसाठी ‘आयटीआर-१’ आणि ‘आयटीआर-२द्’वारे प्राप्तिकर परतावा भरण्यासाठी विवरण दाखल करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै आहे.