नवी दिल्ली : देश विकसित भारताच्या ध्येयाकडे वाटचाल करीत असून, त्यासाठी भांडवल उभारणी , उद्योजकतेला चालना, पायाभूत सुविधांच्या विकासाला पाठबळ यांमध्ये बँकिंग क्षेत्राची भूमिका महत्त्वाची असेल,’ असे मत स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी व्यक्त केले. बुधवारी जाहीर झालेल्या बँकेच्या वार्षिक अहवालानंतर भागधारकांना संबोधित करताना ते बोलत होते.
‘ बँकिंग क्षेत्र अधिक सक्षम करण्यासाठी तंत्रज्ञान , डेटा ॲनालिटिक्स, आर्टिफिशियल इंटेलिजन्स , सायबर सुरक्षा आणि डिजिटल पायाभूत सुविधांमध्ये गुंतवणूक करण्याची गरज आहे. मागील आर्थिक वर्ष बँकांसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरले,’ असेही शेट्टी यांनी नमूद केले. आगामी काळात बँकांनी दर्जा सुधारावा, असेही ते म्हणाले.




