‘कोल इंडिया’ची भागविक्री सुरू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कोल इंडियाच्या भागविक्रीला बुधवारी संस्थागत गुंतवणूकदारांनी मोठा प्रतिसाद दिला. सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या बोली लावण्यात आल्या. केंद्र सरकार कोल इंडियामधील आपला हिस्सा विकत आहे. किरकोळ गुंतवणूकदार २९ मे रोजी बोली लावू शकतील. संस्थागत गुंतवणूकदारांनी राखीव समभागांच्या आठपट अधिक समभागांसाठी बोली लावली.

coal india ipo receives overwhelming response from institutional investors

नवी दिल्ली : संस्थागत गुंतवणूकदारांनी बुधवारी ‘कोल इंडिया’च्या समभाग खरेदीला उदंड प्रतिसाद दिला. भागविक्रीच्या पहिल्याच दिवशी सुमारे १९ हजार कोटी रुपयांच्या बोली लावल्या गेल्या.

केंद्र सरकार ‘कोल इंडिया’मधील आपला १२.३२ कोटींहून अधिक, म्हणजेच दोन टक्क्यांपर्यंतचा हिस्सा प्रतिसमभाग ४१२ रुपये या किमान किमतीला विकत आहे.

या इश्यूमध्ये एक टक्क्यांच्या ‘ग्रीन-शू’ पर्यायाचाही समावेश आहे. किरकोळ गुंतवणूकदार २९ मे रोजी या ‘ऑफर फॉर सेल’मध्ये (ओएफएस) बोली लावू शकतील.

बिगर किरकोळ किंवा संस्थागत गुंतवणूकदारांनी त्यांच्यासाठी राखीव असलेल्या समभागांच्या आठपट अधिक म्हणजेच ४५.१५ कोटींहून अधिक समभागांसाठी बोली लावली.

ही बोली ४३६.६९ रुपये प्रतिसमभाग या सूचक किमतीवर लावण्यात आली.