अफूतस्कर झारखंडमध्ये जेरबंद

महाराष्ट्र टाइम्स

नागपूर शहर अमली पदार्थ तस्करीसाठी वापरले जात आहे. ग्रामीण पोलिसांनी झारखंडमधील एका हॉटेल व्यावसायिकाला अटक केली आहे. त्याच्याकडून ३३ किलो अफू आणि २३ लाखांहून अधिक रोख रक्कम जप्त करण्यात आली आहे. या तस्करांच्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून, इतर साथीदारांचा शोध सुरू आहे. ही कारवाई पोलिसांच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने केली आहे.

अफूतस्कर झारखंडमध्ये जेरबंद
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असल्याने विविध राज्यांना जोडणारे महत्त्वाचे वाहतूक केंद्र मानले जाते. याच कारणामुळे अमली पदार्थ तस्करांकडूनही शहराचा ‘ट्रान्झिट रूट’ म्हणून वापर वाढत असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून समोर येत आहे. विशेषतः झारखंड , ओडिशा आणि मध्य प्रदेशातून अफू व गांजाची तस्करी ट्रक आणि खासगी वाहनांद्वारे केली जाते. ग्रामीण पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने गेल्या काही महिन्यांत अशा अनेक कारवाया करून मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ जप्त केले आहेत.

ग्रामीण पोलिस दलाच्या अमली पदार्थविरोधी पथकाने तस्करांच्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करीत झारखंडमधील हॉटेल व्यावसायिकाला अटक केली. त्याचे साथीदार फरार असून, पथक त्यांचा कसून शोध घेत आहेत.

मनीषकुमार अंबिकाप्रसाद (वय ४६, रा. भंडारटोली, करपनदास, जि. सिमडेगा, झारखंड) असे अटकेतील हॉटेल व्यावसायिकाचे नाव आहे.

काही दिवसांपूर्वी पोलिसांनी उमरेडमधील उदासा परिसरात एका ट्रकचालकाला अटक केली. त्याच्याकडून १ लाख १८ हजार रुपये किमतीचा अफू जप्त केला. पोलिस अधीक्षक हर्ष पोद्दार यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक अनिल म्हस्के यांच्या नेतृत्वातील पथकाने अन्य तस्करांचा शोध सुरू केला. मनीषकुमार हा मोठ्या प्रमाणात झारखंडमधून नागपूरसह मध्य भारतात अफिमची तस्करी करीत असल्याची माहिती समोर आली. पोलिसांचे पथक झारखंडला गेले आणि मनीषकुमारच्या घरी छापा टाकला. पोलिसांनी त्याच्याकडून ३३ किलो ७६७ ग्रॅम अफू व २३ लाख ३५ हजार रुपयांची रोख जप्त केली. मनीषकुमार याची पोलिस कोठडी घेण्यात आली असून, त्याच्या अन्य साथीदारांचा पोलिस कसून शोध घेत आहेत.