महापूजा, हवाई दलाची प्रात्यक्षिके

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पंतप्रधान श्री शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करत होते. यावेळी देशभरातील पवित्र जल वापरून कुंभाभिषेक झाला. गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीही उपस्थित होते. ध्वजपूजा झाली आणि हेलिकॉप्टरने पुष्पवृष्टी करण्यात आली. हवाई दलाच्या विमानांनी तिरंग्याची प्रतिकृती साकारली. हा सोहळा अत्यंत भव्य होता.

maha puja and air force demonstrations a grand event led by the prime minister

या सोहळ्यासाठी येथे आलेल्या पंतप्रधानांचा एक भव्य रोड शो पार पडला. त्यानंतर त्यांच्या हस्ते विशेष महापूजा करण्यात आली. पंतप्रधान श्री शंकराच्या पिंडीवर जलाभिषेक करत असताना पुरोहितवर्गाने वैदिक मंत्रघोष केला. यावेळी शिवलिंगावर कुंभाभिषेकही झाला. यासाठी देशभरातील प्रमुख तीर्थक्षेत्रांतील पवित्र जल एकत्र करण्यात आले होते. पंतप्रधानांसोबत यावेळी गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल, उपमुख्यमंत्री हर्ष संघवी हेही उपस्थित होते. या सोहळ्याच्या निमित्ताने ध्वजपूजाही करण्यात आली. तसेच, मंदिरावर हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी झाली. या मंदिरावरील आकाशात हवाई दलाच्या विमानांनी रंगीत धूर सोडून निर्माण केलेली तिरंग्याची प्रतिकृती आकर्षणाचा विषय ठरली.