पाच बांगलादेशी महिलांविरोधात गुन्हा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पुणे पोलिसांनी बुधवार पेठेत मोठी कारवाई केली. बेकायदा वास्तव्य करणाऱ्या पाच बांगलादेशी महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले. फरासखाना पोलिसांनी ही कारवाई केली. या महिलांनी भारतात घुसखोरी केल्याचे तपासात उघड झाले. पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्या निर्देशानुसार ही कारवाई सुरू आहे. यापूर्वीही खडक पोलिसांनी १५ जणांना ताब्यात घेतले होते.

pune police action against bangladeshi women

पुणे : बुधवार पेठेतील वेश्यावस्तीत पुणे पोलिसांनी कारवाई करून पाच बांगलादेशी महिलांना ताब्यात घेतले. भारतात बेकायदा वास्तव्य केल्याप्रकरणी या महिलांविरुद्ध फरासखाना पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी शहरातील बेकायदा वास्तव्यास असलेल्या बांगलादेशी नागरिकांचा शोध घेऊन कठोर कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार गेल्या आठवड्यात खडक पोलिसांनी बुधवार पेठ परिसरात छापा टाकून बांगलादेशी महिलांसह १५ जणांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर रविवारी मध्यरात्री फरासखाना पोलिसांनी पुन्हा वेश्यावस्तीत शोधमोहीम राबवली. या वेळी पाच महिलांना ताब्यात घेण्यात आले, अशी माहिती परिमंडळ एकचे उपायुक्त कृषीकेश रावले यांनी दिली. महिलांची चौकशी केल्यानंतर त्यांनी भारतात घुसखोरी केल्याचे समोर आले. अतिरिक्त आयुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्या पथकाने कारवाई केली.