सोनेखरेदीला आवरा; देशाची तिजोरी सावरा

महाराष्ट्र टाइम्स

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोन्याची खरेदी टाळण्याचे आवाहन केले आहे. पश्चिम आशियातील तणाव आणि तेलाच्या वाढत्या किमतींमुळे परकी चलन साठ्यावर ताण येत आहे. या पार्श्वभूमीवर सरकार परकी चलन गंगाजळीच्या संरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेणार आहे. जळगावच्या सुवर्ण व्यावसायिकांनी देशहिताला प्राधान्य देत या आवाहनाचे स्वागत केले आहे.

stop gold purchases save the nations economy

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी हैदराबाद येथे सोन्याची खरेदी न करण्याचे केलेले आवाहन भावनिक नसून, त्यामागे एक धोरणात्मक इशारा दडल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. पश्चिम आशियातील वाढता तणाव आणि कच्च्या तेलाच्या वाढत्या किमतींमुळे भारताच्या परकी चलन साठ्यावर मोठा ताण येत आहे. या दोन घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार परकी चलनाच्या गंगाजळीच्या (फॉरेक्स रिझर्व्ह) संरक्षणासाठी आक्रमक पवित्रा घेण्याची शक्यता आहे.

‘वर्षभर सोने खरेदी टाळा,’ या पंतप्रधान नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनामुळे मंदीच्या भीतीमुळे जळगावच्या सुवर्णनगरीचा हृदयाचा ठोका चुकला आहे. मात्र, असे असले, तरी जळगावातील सुवर्ण व्यावसायिकांनी देशहिताला प्राधान्य देऊन पंतप्रधानांच्या आवाहनाचे स्वागत केले आहे.