पणजी : गोव्याच्या कुशावती जिल्ह्यात नुकत्याच मृतावस्थेत आढळलेल्या वाघाचा मृत्यू वनविभागाच्या प्राथमिक निष्कर्षांनुसार रानटी कुत्र्यांमुळे झाल्याचे सांगत राज्याचे वनमंत्री विश्वजित राणे यांनी शिकारीची शक्यता फेटाळून लावली. गोवा-कर्नाटक सीमेवरील मोलेम येथील भगवान महावीर अभयारण्याजवळील सकोर्डेम गावात २ मे रोजी एका प्रौढ वाघाचा कुजलेला मृतदेह आढळला होता. या वाघाची नखे आणि दात गायब होते. या मृत्यूची चौकशी करण्याचे आदेश देण्यात आले होते. ‘गोव्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक या घटनेची चौकशी करत असून ती पूर्ण झाल्यानंतरच आम्ही तपशील देऊ शकू,’ असे त्यांनी सांगितले.







