‘तृणमूल’कडूनकोर्टात युक्तिवाद

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसने मतदारयाद्यांमधून नावे वगळल्याचा आरोप केला आहे. भाजपने जिंकलेल्या जागांपेक्षा जास्त मतदारांची नावे काढल्याचा दावा केला आहे. दुसरीकडे, केरळमध्ये काँग्रेसला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले असले तरी मुख्यमंत्रिपदाबाबत अजूनही अनिश्चितता आहे. पक्षश्रेष्ठींनी वरिष्ठ नेत्यांशी चर्चा सुरू केली आहे. अनेक प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे.

trinamool congress challenges voter name exclusion process in court

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये मतदारयाद्यांच्या ‘विशेष सखोल पडताळणी’दरम्यान (एसआयआर) मतदारांची नावे वगळण्यात आल्यामुळे काही विधानसभा मतदारसंघांमधील निकालांवर लक्षणीय परिणाम झाल्याचे म्हणणे तृणमूल काँग्रेसने सोमवारी न्यायालयात मांडले. या प्रक्रियेदरम्यान वगळलेल्या मतदारांची संख्या भाजपने विजय मिळवलेल्या ३१ जागांवरील मताधिक्याहून अधिक असल्याचा दावाही पक्षाने या वेळी केला.

सविस्तर वृत्त... ८

केरळमध्ये तिढा कायम

तिरुअनंतपुरम : विधानसभा निवडणुकीमध्ये घवघवीत यश मिळवूनही काँग्रेसकडून अद्याप मुख्यमंत्रिपदाबाबत अनिश्चितता कायम आहे. पक्षश्रेष्ठींनी केरळमधील वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, चर्चेसाठी अनेक प्रमुख नेत्यांना दिल्लीला बोलावण्यात आले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सविस्तर वृत्त... ८