विजय यांनी घेतली स्टॅलिन यांची भेट

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मुख्यमंत्री विजय यांनी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची भेट घेतली. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार १३ मे रोजी बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजय यांनी प्रथमच स्टॅलिन यांची भेट घेतली. ही भेट राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय ठरली आहे.

vijay and stalins historical meeting

चेन्नई : तमिळनाडूचे मुख्यमंत्री विजय यांनी सोमवारी बहुमत चाचणीच्या आधी द्रमुकचे अध्यक्ष एम. के. स्टॅलिन यांची अलवरपेट येथील त्याच्या निवासस्थानी भेट घेतली. विजय यांच्या नेतृत्वाखालील सरकार १३ मे रोजी बहुमत चाचणीला सामोरे जाणार आहे. विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर विजय यांनी प्रथमच स्टॅलिन यांची भेट घेतली.