‘ऑटो क्लस्टर’तर्फे नवकल्पनांचा गौरव

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पिंपरी येथील ऑटो क्लस्टरने राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन साजरा केला. या निमित्ताने वैज्ञानिक प्रगती आणि तांत्रिक नवकल्पनांना प्रोत्साहन देण्यात आले. पोखरण अणुचाचणीच्या यशाचे स्मरण करण्यात आले. पाच नाविन्यपूर्ण उद्योगांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला अनेक उद्योग, विद्यार्थी आणि तंत्रज्ञानप्रेमी उपस्थित होते.

auto cluster honors innovations special recognition on national technology day

पिंपरी : ‘ ऑटो क्लस्टर डेव्हलपमेंट’ व ‘रिसर्च इन्स्टिट्यूट’तर्फे राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. भारताची वैज्ञानिक प्रगती, तांत्रिक नवकल्पना आणि १९९८ मधील पोखरण अणुचाचणीच्या यशाच्या स्मरणार्थ नुकताच ‘राष्ट्रीय तंत्रज्ञान दिन’ साजरा करण्यात आला.

या वेळी व्यासपीठावर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे ज्येष्ठ माहिती तंत्रज्ञानतज्ज्ञ डॉ. दीपक शिकारपूर, डॉ. सुधीर लांडे, ऑटो क्लस्टरचे व्यवस्थापकीय संचालक किरण वैद्य उपस्थित होते.

यानिमित्त ‘ऑटो क्लस्टर’तर्फे स्टेकवेल रबर प्रायव्हेट लि.च्या ज्योती पवार, रडार स्नाइपर प्रायव्हेट लि.चे जयकुमार चौधरी, जयश्री पॉलिमर प्रायवेट लि.च्या प्रियांका दुर्गे, अल्टएअर इंफ्रासेक प्रायव्हेट लि.चे हृषीकेश जोशी आणि क्विलिझ लाइफटेक प्रायव्हेट लि.चे स्वप्नील बुकशेटे या पाच नाविन्यपूर्ण उद्योगांचा विशेष सन्मान करण्यात आला. कार्यक्रमास शेकडो अभियांत्रिकी उद्योग, विद्यार्थी, नवउद्योजक आणि तंत्रज्ञानप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.