शहरातील पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी गिरीस्थान नगरपरिषदेच्या वतीने नळजोडणी अभियान राबविण्यात येत आहे, अशी माहिती मुख्याधिकारी शेख समीर यांनी दिली.
शेख समीर म्हणाले, ‘नगर परिषदेच्या असे निदर्शनास आले आहे की अनेक नळजोडण्यामुळे मालकांच्या नावावर नसून ते मृत झालेले आहेत किंवा मालमत्ता अनेक वेळा हस्तांतरित झाले आहे. काही नागरिक जुनी पाणीपट्टी न भरता अनधिकृत करणे, नवीन जोडणी घेऊन पाण्याचा वापर करीत आहेत. त्यामुळे नळजोडणी नोंदणी अद्यावत करण्यासाठी नागरिकांना सुलभ सेवा देण्यासाठी विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. सहा मे ते ३१ मे या दरम्यान नळजोडणी अभियान राबविण्यात येत आहे. यात नळजोडणी नावात बदल, वारस नोंद, अनधिकृत नळ जोडणी नियमीकरण जोडणे, भोगवटादार वापर नोंद सोबत आवश्यक कागदपत्र दाखल करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थकीत पाणीपट्टी भरणे अनिवार्य करण्यात आले मुदतीत शहरात धडक तपासणी मोहीम येणार आहे. ज्यांच्याकडे अनधिकृत नळ जोडणी आढळल्यास; तसेच पाणीपट्टी थकबाकी असेल त्यांची नळजोडणी पूर्वसूचना न देता तत्काळ खंडित करण्यात येईल असा इशारा शेख समीर यांनी या वेळी दिली. खुलताबाद शहराच्या विकासासाठी व सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी सर्व नागरिकांनी नगर परिषदेला सहकार्य करावे असे आवाहन नगर परिषदेचे मुख्याधिकारी शेख समीर यांनी केले आहे.






