Cbi Team Investigates Neet Paper Leak Case In Latur
सीबीआयकडून लातूरमध्ये तपासणी
महाराष्ट्र टाइम्स.कॉम•
सीबीआय पथकाने लातूरमध्ये 'नीट' पेपरफुटी प्रकरणी रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसच्या (आरसीसी) संचालकांच्या कार्यालयाची पुन्हा तपासणी केली. पथकाने रविवारी दुपारी अडीच वाजता कार्यालयात प्रवेश केला. सायंकाळपर्यंत अधिकारी माहिती गोळा करत होते. कार्यालयातील कागदपत्रे आणि संगणकांची तपासणी करण्यात आली. या तपासणीमुळे प्रकरणातील नवीन धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) पथकाने येथील रेणुकाई केमिस्ट्री क्लासेसच्या (आरसीसी) संचालकांच्या कार्यालयाची रविवारी पुन्हा तपासणी केली.
पथक रविवारी दुपारी अडीचला क्लासच्या कार्यालयात दाखल झाले. पथकातील अधिकारी सायंकाळी पाचपर्यंत माहिती गोळा करीत होते. पथकाने कार्यालयातील कागदपत्रे, संगणकाची तपासणी केल्याचे समजते.