पिंपरी : ज्येष्ठ नागरिक संघ चिंचवडतर्फे ‘ वासंतिक व्याख्यानमाला ’ आयोजित करण्यात आली. ‘ अध्यात्म आणि विज्ञान ’ या विषयाचे न्युक्लिअर सायंटिस्ट डॉ. विवेक नागेश येळगावकर यांनी प्रथम पुष्प गुंफले. अध्यक्ष रमेश इनामदार यांनी प्रास्ताविक केले.
दुसरे पुष्प कवी, लेखक पितांबर लोहार यांनी गुंफले. त्यांनी त्यांच्या भाषणात ‘जीवन सुंदर आहे’ हा विषय साध्या सोप्या भाषेत सोदाहरण स्पष्ट केला. तिसरे आणि शेवटचे पुष्प स्मिता मराठे यांनी गुंफले. त्यांनी ‘ नाम महिमा’ त्यांनी या विषयावर अतिशय साध्या सोप्या आणि रसाळ भाषेत नाममहात्म्य विशद केले. सूत्रसंचालन श्यामकांत खटावकर यांनी केले.






