‘इबोला ही जागतिक आरोग्य आणीबाणी’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

जागतिक आरोग्य संघटनेने काँगो आणि युगांडामधील इबोला उद्रेकाला जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित केले आहे. इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू झाला असून ३०० हून अधिक संशयित रुग्ण आहेत. काँगोची राजधानी किन्शासामध्येही रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे. संघटनेने आंतरराष्ट्रीय सीमा बंद न करण्याचे आवाहन केले आहे.

‘इबोला ही जागतिक आरोग्य आणीबाणी’

काँगो आणि युगांडामध्ये इबोलाचा उद्रेक ही जागतिक आरोग्य आणीबाणी असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेचे (डब्ल्यूएचओ) महासंचालक तेद्रोस अधानोम गेब्रेयसस यांनी रविवारी जाहीर केले. मात्र, ही स्थिती करोना साथीप्रमाणे नसल्याने आंतरराष्ट्रीय सीमा बंद करू नका, असे आवाहन संघटनेने केले आहे.

इबोलामुळे ८८ जणांचा मृत्यू झाला असून, त्याचे ३००हून अधिक संशयित रुग्ण आहेत. काँगोमधील इतुरी हा प्रांत इबोलाच्या उद्रेकाचा केंद्रबिंदू आहे. मात्र, तिथून सुमारे एक हजार किलोमीटरवर असलेली काँगोची राजधानी किन्शासामध्येही इबोलाचा रुग्ण आढळला आहे. त्यामुळे इबोलाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरल्याचे मानले जाते. उत्तर किवू प्रांतामध्येही इबोलाचे रुग्ण आढळले आहेत.