धुळे : साक्री तालुक्यातील निजामपूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी (१६ मे) दुहेरी हत्याकांड उघडकीस आले. एक महिला आणि तिच्या मित्राचा खून केल्याप्रकरणी निजामपूर पोलिसांनी भोंदूबाबा योगेश खैरनार याला अटक केली. त्याच्याविरुद्ध निजामपूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
साक्री तालुक्यातील रायपूर ते वर्धाने रस्त्यालगत दुचाकीजवळ एका महिलेचा मृतदेह आढळला होता. जयश्री रजनीकांत काकुस्ते-हिरे (रा. कासारे, ता. साक्री) असे मृत महिलेचे नाव आहे.






