‘त्या’ मुलींचे शुल्क सरकार भरणार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

बदलापूर येथील शाळेत ऑगस्ट २०२४ मध्ये घडलेल्या एका दुर्दैवी घटनेतील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या मुलींचे दहावीपर्यंतचे प्रवेश शुल्क आता सरकार भरणार आहे. शिक्षण विभागाने हा विशेष निर्णय घेतला असून, या संदर्भात शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. यामुळे या मुलींच्या शिक्षणात कोणताही खंड पडणार नाही.

government to cover education fees for minor girls in badlapur

मुंबई : बदलापूर येथील शाळेत ऑगस्ट २०२४मध्ये घडलेल्या अनुचित घटनेतील दोन अल्पवयीन मुलींच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये, म्हणून या मुलींचे दहावीपर्यंत प्रवेश शुल्क भरण्याचा निर्णयाला अखेर राज्य सरकारने मान्यता दिली आहे. विशेष बाब म्हणून शिक्षण विभागातर्फे हा निर्णय घेण्यात आला असून या संदर्भातील शासन निर्णय नुकताच जाहीर करण्यात आला आहे.