पिंपरी : हाँगकाँग येथे दिनांक नऊ मे आणि १० मे रोजी आयोजित करण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय योगा स्पर्धेत ११ राष्ट्रांचा सहभाग होता. या प्रतिष्ठित स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करून प्रणित गणेश आढाव यांनी ट्रॅडिशनल योगा आणि आर्टिस्टिक योगा या दोन्ही प्रकारांमध्ये उत्तम कामगिरी करून सुवर्णपदक पटकावत देशाचा गौरव वाढवला.
योगशिक्षिका वर्षा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली प्रणित यांनी अथक मेहनत, सातत्यपूर्ण सराव आणि आत्मविश्वासाच्या जोरावर यश संपादन केले. त्यांच्या उत्कृष्ट सादरीकरणामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताच्या योगपरंपरेचा गौरव वाढला आहे.






