कल्याण यार्डात मुलीवर बलात्कार

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

कल्याण रेल्वे स्थानकात एका १४ वर्षीय तरुणीवर बलात्कार झाला. मामाकडे जाण्यासाठी लोकलची वाट पाहत असताना आरोपीने तिचा मोबाइल हिसकावला. मोबाइल परत देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला यार्डात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. पोलिसांनी आरोपी सौरभ सोनवणे याला अटक केली आहे. ही घटना शनिवारी सायंकाळी घडली.

rape of 14 year old girl at kalyan station

कल्याण : अहिल्यानगरहून मामाकडे जाण्यासाठी आलेली १४ वर्षीय तरुणी कल्याण रेल्वे स्थानकात लोकलची प्रतीक्षा करीत असताना एका नराधमाने तिचा मोबाइल हिसकावला. मोबाइलसाठी पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगून त्याने तिला फलाटालगत असलेल्या यार्डात नेऊन, तिच्यावर बलात्कार केल्याची घटना कल्याण रेल्वेे स्थानकात शनिवारी सायंकाळी घडली. या प्रकरणी रेल्वे पोलिसांनी सौरभ सोनवणे (वय २३) या आरोपीला रविवारी अटक केली.

ही तरुणी शनिवारी सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास खोपोली गाडीची वाट पाहत थांबलेली असताना अचानक तिच्याकडे सौरभ आला. त्याने तिच्याकडे फोन क्रमांक मागितला. मात्र तिने देण्यास नकार देताच त्याने तिचा मोबाइल हिसकावला. मोबाइल परत हवा असल्यास पोलिस ठाण्यात यावे लागेल, असे सांगत त्याने तिला उलट दिशेने सात क्रमांकाच्या फलाटाबाहेर यार्डात नेले आणि अत्याचार केला.