खुलताबाद : तालुक्यातील कागजीपुरा ते मावसाळा या शिव रस्त्यावरील अतिक्रमण दूर करून हा रस्ता शेतकऱ्यांसाठी उपलब्ध व्हावा यासाठी या भागातील शेतकरी शेख अझहर शेख मिसबाउद्दिन यांच्या लढाईला यश आले आहे. शेख अझहर यांचे वडील शेख मिसबाउद्दिन गेल्या २० वर्षांपासून शिव रस्त्यासाठी झगडत होते.
अखेर महसूल प्रशासनाने शिवरस्ता व शेतकऱ्यांना वापरण्यासाठी मोकळा करून दिला. गेल्या अनेक वर्षापासून हा रस्ता नसल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करताना तसेच शेतीमाल बाजारपेठेत घेऊन जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत होता. उपविभागीय अधिकारी संतोष गोरड व तहसीलदार संतोष गुट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली मंडळ अधिकारी विजय चव्हाण, ग्राम मसूर अधिकारी माधवी हिवरकर, भूमी अभिलेख विभागाचे कर्मचारी यांनी शिवरस्त्याची मोजणी करून रस्त्यावरील अतिक्रमण दूर केले. हा रस्ता शेतकऱ्यांसाठी खुला करण्यात आला आहे.






