धर्मादाय ट्रस्टसाठी मार्गदर्शनपर शिबिर

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

पिंपरी येथे धर्मादाय ट्रस्टसाठी मार्गदर्शन शिबिर झाले. सीए चंद्रकांत काळे आणि ॲड. विकास वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. 'ट्रस्ट की सेक्शन ८ कंपनी' या विषयावर चर्चा झाली. आयकर, १२ ए, ८० जी नोंदणी, एफसीआरए, सीएसआर निधी संदर्भातील नव्या तरतुदी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.

special guidance workshop for charitable trusts held in pimpri

पिंपरी : धार्मिक आणि सामाजिक ट्रस्टच्या कामकाजात येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी व नवीन कायद्यांविषयी जनजागृती करण्यासाठी पिंपरी येथे विशेष सेमिनार पार पडले. सावित्रीबाई फुले हॉल येथे संपन्न झालेल्या शिबिरात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ज्येष्ठ सनदी लेखापाल सीए चंद्रकांत काळे आणि ॲड. विकास वाघमारे यांनी मार्गदर्शन केले. ‘ट्रस्ट की सेक्शन ८ कंपनी’ या विषयावर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. आयकर, १२ ए, ८० जी नोंदणी, एफसीआरए, सीएसआर निधी संदर्भातील नव्या तरतुदी त्यांनी सोप्या भाषेत समजावून सांगितल्या.

गुड समॅरीटन ग्रुप, सत्य नाताळ विशेषांक, दी युनायटेड पास्टर्स अँड लीडर्स ट्रस्ट आणि दी सोसायटी ऑफ ख्रिश्चन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती.

सूत्रसंचालन पास्टर बन्यामीन काळे यांनी केले. गुड समॅरीटन ग्रुपचे रेव्ह. सॅमसन चोपडे, पास्टर संतोष वाघमारे, शलमोन काळे यांनी सहकार्य केले.