चंडीगड : डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत रामरहीम याला ३० दिवसांचा पॅरोल मंजूर करण्यात आला आहे. आश्रमातील दोन शिष्यांच्या बलात्कार प्रकरणात २०१७ मध्ये रामरहीमला २० वर्षांचा कारावास सुनावण्यात आला. तेव्हापासून तब्बल १६ वेळा त्याला तुरुंगातून सुट्टी मंजूर झाली आहे.
रामरहीम सध्या रोहतक येथील सुनैरा कारागृहात आहे. मंगळवारी पॅरोल मंजूर झाल्यानंतर तो थेट सिरसा येथील त्याच्या डेरा येथे गेला. पॅरोलच्या काळात तो येथेच राहणार असल्याचे त्याच्या प्रवक्त्याने सांगितले. रामरहीमला वारंवार दिल्या जाणाऱ्या पॅरोलवर शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समितीने अनेकदा टीका केली आहे.









