‘पाकिस्तानच्या पंजाब सरकारने लाहोरमधील रस्त्यांची फाळणीपूर्वीची मूळ हिंदू आणि शीख नावे पुनर्स्थापित करण्याची योजना पुढे ढकलली आहे. अतिरेकी संघटनांकडून होणारा विरोध टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला,’ असे एका अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले.
‘लाहोर हेरिटेज एरियाज रिव्हायवल’च्या (एलएएचआर) नुकत्याच झालेल्या बैठकीत लाहोर आणि परिसरातील रस्त्यांची मूळ ऐतिहासिक नावे पुनर्स्थापित करण्यास मंजुरी देण्यात आली होती. ‘पीएमएल-एन’चे अध्यक्ष नवाझ शरीफ आणि त्यांची कन्या, पंजाबच्या मुख्यमंत्री मरियम नवाझ यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली होती.
मात्र, व्लॉगर्ससह काही अतिरेकी संघटनांनी लाहोरमधील रस्ते व गल्ल्यांची फाळणीपूर्वीची नावे पुनर्स्थापित केल्याबद्दल जोरदार टीका केली. त्यामुळे हा निर्णय लांबणीवर टाकण्यात आल्याचे समजते.









