त्विशाच्या सासरची चौकशी

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

मॉडेल-अभिनेत्री त्विशा शर्माच्या मृत्यूचा तपास सीबीआय करत आहे. सीबीआयने त्विशाच्या सासू, निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांची चौकशी केली. महिला कर्मचाऱ्यांच्या पथकाने कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. हे पथक त्विशाच्या माहेरी तळ ठोकून आहे. आवश्यक कागदपत्रे आणि पुरावे गोळा केले जात आहेत.

cbi inquiry in the case of twisha sharmas death

भोपाळ : त्विशा शर्मा हिच्या मृत्यू प्रकरणी तिची सासू, निवृत्त न्यायाधीश गिरिबाला सिंह यांची सीबीआयने मंगळवारी कसून चौकशी केली.

मॉडेल-अभिनेत्री त्विशा शर्मा हिच्या मृत्यूप्रकरणाचा तपास सोमवारी सीबीआयने हाती घेतला. महिला कर्मचाऱ्यांच्या तपास पथकाने कुटुंबातील सदस्यांची चौकशी केली. त्यानंतर पथक शाहजहानाबाद परिसरातील त्विशाच्या माहेरी गेले. सध्या हे पथक तेथेच तळ ठोकून आहे. या तपासात आवश्यक कागदपत्रे व पुरावे गोळा करणार आहे.