शिका माइंडफुल लिव्हिंग, तणाव व्यवस्थापन

महाराष्ट्र टाइम्स

आता तुम्ही माइंडफुल लिव्हिंग आणि तणाव व्यवस्थापन शिकू शकता. अतिविचार, भावनिक ताण आणि चिंतेवर मात करण्यासाठी हा अभ्यासक्रम आहे. 'स्किल इंडिया' आणि 'संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्र'तर्फे हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेतला जाईल. प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ श्रीधर कुलकर्णी मार्गदर्शन करतील. तीन जूनपासून दर बुधवारी सायंकाळी सात ते नऊ या वेळेत सत्रे होतील. अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना 'स्किल इंडिया'चे प्रमाणपत्र मिळेल.

शिका माइंडफुल लिव्हिंग, तणाव व्यवस्थापन
(फोटो- महाराष्ट्र टाइम्स)

सध्याच्या काळातील अतिविचार, भावनिक ताण, चिंतेवर मात करून मन, भावना आणि तणावाचे मानसिक संतुलन जपण्याची मानसशास्त्रीय पद्धत आता जाणून घेता येणार आहे. यासाठी ‘माइंडफुल लिव्हिंग आणि तणाव व्यवस्थापन ’ या विषयावर दोन महिन्यांचा अभ्यासक्रम तयार केला असून, यामध्ये प्रात्यक्षिकांसह सखोल माहिती मिळणार आहे.

‘ स्किल इंडिया ’ सहयोगी ‘संवेदन मानसशास्त्र अभ्यास केंद्रा’तर्फे ‘माइंडफुल लिव्हिंग आणि तणाव व्यवस्थापन’ हा प्रमाणपत्र अभ्यासक्रम घेण्यात येणार आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब’ या उपक्रमाचा मीडिया पार्टनर आहे. यासाठी प्रसिद्ध मानसशास्त्रज्ञ श्रीधर कुलकर्णी मार्गदर्शन करणार आहेत.


शिका माइंडफुल लिव्हिंग, तणाव व्यवस्थापन

अभ्यासक्रमांतर्गत तीन जूनपासून दोन महिने दर बुधवारी रात्री सात ते नऊ या वेळात लाइव्ह चर्चात्मक सत्रे होणार असून, रेकॉर्डेड सत्रे ‘संवेदन’च्या ट्रेनिंग ॲप्लिकेशनवर उपलब्ध असतील. यासह आठवडाभर सराव आणि वैयक्तिक मार्गदर्शनावर भर देण्यात येणार आहे. हा अभ्यासक्रम पूर्ण करणाऱ्यांना ‘स्किल इंडिया’चे प्रमाणपत्र देण्यात येणार असून, त्यांना माइंडफुलनेस कोच म्हणून काम करता येणार आहे. यासाठी मर्यादित जागा असून, अधिक माहितीसाठी इच्छुकांनी ९९७५७६९३७१ / ८७६७५९०३५५ या क्रमांकावर संपर्क साधावा.