‘जनगणनेच्या वेळी सावधपणे नोंद करा’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूर येथे जनगणनेच्या वेळी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात आले. विश्‍व हिंदू परिषदेचे मिलिंद परांडे यांनी धर्म नोंदणीबाबत सुरू असलेल्या अपप्रचारापासून सावध राहून हिंदू म्हणून नोंद करण्याचे आवाहन केले. देवगिरी प्रांताच्या शौर्य प्रशिक्षण वर्गाच्या समारोपात त्यांनी हे विचार मांडले. जन्मदराचा दीर्घकालीन विचार करणे आवश्यक असल्याचेही त्यांनी सांगितले.

census caution register as hindu

लातूर : ‘देशाचा सर्वांगीण दस्तऐवज करण्याचे काम जनगणनेच्या माध्यमातून होत आहे. जनगणना करणार् या कर्मचार् यांना सहकार्य करा, सध्या धर्म म्हणून नोंद करण्याबाबत अपप्रचार सुरू आहे. त्यापासून सावध राहून हिंदू म्हणूनच नोंद करा,’ असे आवाहन विश् व हिंदू परिषदेचे अखिल भारतीय संघटन महामंत्री मिलिंद परांडे यांनी केले.

विश् व हिंदू परिषद बजरंग दलाच्या देवगिरी प्रांताचा शौर्य प्रशिक्षण वर्गाचा समारोप नुकताच झाला. या वेळी मिलिंद परांडे प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. समारोप समारंभास प्रमुख पाहुणे म्हणुन भरतमहाराज भिंगोलीकर, डॉ. गिरीश पाटील, वर्गाधिकारी राजीव जाहगीरदार आदी उपस्थित होते.

वर्गाधिकारी जाहगीरदार यांनी प्रास्ताविक करून सात दिवसांच्या प्रशिक्षण वर्गातील शारीरिक आणि बौद्धिक उपक्रमाची माहिती दिली.

या वेळी बोलताना परांडे म्हणाले, की जन्मदराचा विचार दीर्घकालीन केला पाहिजे. हिंदू समाजासमोर सध्या तीन मोठी आव्हाने असल्याचे परांडे यांनी सांगितले.