भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने तरुणाचा मृत्यू

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

लातूरमध्ये भटक्या कुत्र्यांनी चावा घेतल्याने एका तरुणाचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संतप्त नातेवाइकांनी मृतदेह थेट महापालिकेच्या पायरीवर ठेवून आंदोलन केले. प्रशासनाने तातडीने भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी यावेळी करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. मृताच्या कुटुंबीयांना न्याय मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

young mans tragic death due to stray dog bites

लातूर : मच्छी मार्केट भागात तीन दिवसांपूर्वी विलास गोरवे याचा चार-पाच भटक्या कुत्र्यांनी चावा घेतला. त्या तरुणाचे आज शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना निधन झाले. मृताच्या नातेवाइकांनी तरुणाचे प्रेत थेट महापालिकेच्या पायऱ्यावर ठेवून आंदोलन केले. ‘आम्हाला न्याय पाहिजे,’ असे म्हणून आक्रोश करीत होते.

हा तरुण मच्छी मार्केट भागात लघुशंकेसाठी जात असताना त्या भागातील चार-पाच मोकाट कुत्र्यांनी त्याचा चावा घेतला. त्याच्यावर शासकीय रुग्णालयात उपचार चालू असताना आज सकाळी त्याचे निधन झाले. तेव्हा पालकांनी ते प्रेत रुग्णवाहिकेतून थेट महापालिकेच्या पायरीवर आणून ठेवले. त्यांचे नातेवाइक आक्रोश करीत महापालिकेसमोर आले तेव्हा पालिकेचे दोन्ही गेट कुलूप लावून बंद करण्यात आले होते. आक्रमक नातेवाइकांनी गेटला लावलेले कुलूप तोडून आत प्रवेश केला व प्रेत पालिकेच्या पायरीवर ठेवले. भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, कुत्र्याने चावा घेतल्याने आमच्या कुटुंबातील कर्ता तरुण मरण पावला. या प्रकरणी महापालिकेने न्याय द्यावा त्याशिवाय प्रेत उचलणार नाही अशी भूमिका नातेवाइकांनी घेतली. थेट प्रेतच महापालिकेच्या पायरीवर आणून ठेवले. महापौर जयश्री सोनकांबळे, स्थायी समितीचे सभापती सचिन बंडापल्ले, उपमहापौर स्नेहल उटगे, विरोधी पक्षनेते देविदास काळे यांनी भटक्या कुत्र्यांमुळे जीवितास धोका होत असल्याने त्यांचा बंदोबस्त करावा अशी मागणी आयुक्तांकडे केली.