नागपूर : अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेतर्फे सुवर्णमहोत्सवानिमित्त ‘पुस्तकाच्या अंतरंगात’ या कार्यक्रमाचे आयोजन सोमवार, २५ मे रोजी करण्यात आले आहे. प्रख्यात अभिनेत्री आणि लेखिका अमृता सुभाष यांच्या ‘एक उलट एक सुलट : भाग २’ या पुस्तकावर ऑनलाइन चर्चा आणि अमृता सुभाष यांची मुलाखत आणि मुक्तसंवाद असे कार्यक्रमाचे स्वरूप राहील. लेखिका आणि निवेदिका वसुंधरा काशीकर अध्यक्षस्थानी राहतील.
अमृता सुभाष यांच्या पुस्तकाचा परिचय डॉ. विनीता हिंगे करून देतील तर त्यातील काही अंशांचे अभिवाचन डॉ. सुमेधा हर्षे करतील. सूत्रसंचालन नेदरलॅंड्स येथील डॉ. मानसी सगदेव-मोहरील करतील. या कार्यक्रमाची लिंक अभिव्यक्ती वैदर्भीय लेखिका संस्थेच्या फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.







