Release Of Tappoorti Special Edition Celebrating 12 Years Of Prime Minister Narendra Modis Tenure
तपपूर्ती विशेषांकाचे आज प्रकाशन
महाराष्ट्र टाइम्स•
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील १२ वर्षे पूर्ण केली. या निमित्ताने 'राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती' या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन आज, २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. हा प्रकाशन सोहळा रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता आयोजित करण्यात आला आहे. हा अंक पंतप्रधान मोदींच्या १२ वर्षांच्या कार्याचा आढावा घेईल.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधानपदाच्या कार्यकाळातील १२ वर्षे पूर्ण केल्यानिमित्त ‘राष्ट्रनिर्माणाची तपपूर्ती’ या विशेष संग्राह्य अंकाचे प्रकाशन आज, २५ मे रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पार पडणार आहे. नरेंद्र मोदी यांनी २६ मे २०१४ रोजी पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याच्या घटनेला एक तप पूर्ण होत असल्याच्या निमित्ताने प्रभादेवी येथील रवींद्र नाट्य मंदिरात सायंकाळी ४ वाजता हा प्रकाशन सोहळा आयोजित करण्यात आला आहे.