विजयाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा शेवट गोड

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

दिल्ली कॅपिटल्सने कोलकाता नाइट रायडर्स संघाचा पराभव केला. इडन गार्डन्सवर झालेल्या सामन्यात दिल्लीने कोलकाताला विजयासाठी २०४ धावांचे लक्ष्य दिले होते. कोलकाताचा संघ १६३ धावांतच सर्वबाद झाला. के. एल. राहुलने ६० धावांची खेळी केली. अजिंक्य रहाणेने ६३ धावा केल्या. दिल्लीने हा सामना ४० धावांनी जिंकला.

विजयाने दिल्ली कॅपिटल्स संघाचा शेवट गोड

कोलकाता नाइट रायडर्स संघाला आयपीएल टी-२० क्रिकेट स्पर्धेतील प्ले-ऑफमधील स्थान निश्चित करण्यासाठी अखेरच्या लढतीत दिल्ली कॅपिटल्सवर विजय आवश्यक होताच; त्याचबरोबर या आधीच्या लढतीत ‘राजस्थान’चा पराभव अपेक्षित होता. मात्र, ‘राजस्थान’ने विजय मिळवला आणि लढतीपूर्वीच ‘कोलकाता’ची ताकद कमी झाली. याचा फायदा घेऊन ‘दिल्ली’ने ‘कोलकाता’वर ४० धावांनी विजय मिळवला आणि शेवट गोड केला.

इडन गार्डन्स स्टेडियमवर ही लढत झाली. ‘दिल्ली’ने दिलेल्या २०४ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना कर्णधार अजिंक्य रहाणेची लढत एकतर्फी ठरली. त्याला दुसऱ्या बाजूने अपेक्षित साथ मिळाली नाही. ‘कोलकाता’चे फलंदाज खराब फटके मारून बाद झाले. ‘कोलकाता’चा डाव १८.४ षटकांत १६३ धावांतच आटोपला.

तत्पूर्वी, कोलकाता संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. के. एल. राहुलने आक्रमक सुरुवात केली. त्याच्या अर्धशतकाचा अपवाद वगळता एकालाही मोठी खेळी करता आली नाही. मात्र, आघाडीच्या फलंदाजांनी दोन आकडी धावा करून संघाला दोनशे धावांचा टप्पा ओलांडून दिला.

संक्षिप्त धावफलक : दिल्ली कॅपिटल्स - २० षटकांत ५ बाद २०३ (अभिषेक पोरेल २२, के. एल. राहुल ६० (३० चेंडूंत, ५ चौकार, ४ षटकार), साहिल पारख २४, अक्षर पटेल ३९ (२५ चेंडूंत, ३ चौकार, २ षटकार), डेव्हिड मिलर २८ (१९ चेंडूंत ३ षटकार), आशुतोष शर्मा नाबाद १८, सौरभ दुबे ४-०-२८-२, सुनील नारायण ४-०-३८-१, वरुण चक्रवर्ती ४-०-३५-१) वि. वि. कोलकाता नाइट रायडर्स - १८.४ षटकांत सर्व बाद १६३ (अजिंक्य रहाणे ६३ (३९ चेंडूंत, ४ चौकार, ४ षटकार), फिन ॲलेन २०, मनीष पांडे २५ (२ चौकार, २ षटकार), रोवमन पॉवेल २९ (२१ चेंडूंत तीन चौकार, १ षटकार), कुलदीप यादव ४-०-२९-३, अक्षर पटेल ४-०-३८-१, मिचेल स्टार्क ३-०-२६-२, ल्युंगी एन्गिडी ३.४-०-२७-३).