‘इंडिया स्किल्स’मध्येसोनांबेचा हर्ष प्रथम

महाराष्ट्र टाइम्स

सोनांबे गावचे सुपुत्र हर्ष रमेश पवार यांनी 'इंडिया स्किल्स २०२५-२६' राष्ट्रीय स्पर्धेत '३डी डिजिटल गेम आर्ट'मध्ये देशात पहिला क्रमांक मिळवला. या यशाने ते चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण घेतल्यानंतर हर्षने अंतिम परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी केली. यापूर्वीही त्यांनी राज्यस्तरीय आणि प्रादेशिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदके जिंकली होती. त्यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

harsh from sonambe secured first position in india skills 2025 26 competition

तालुक्यातील सोनांबे येथील हर्ष रमेश पवार याने ‘इंडिया स्किल्स २०२५-२६’ या राष्ट्रीय कौशल्य स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकावत चीनमध्ये होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेसाठी पात्रता मिळवली आहे.

‘ ३डी डिजिटल गेम आर्ट ’ या आधुनिक तांत्रिक प्रकारात राष्ट्रीय विजेता ठरल्यानंतर त्याची ‘नॅशनल चॅम्पियन’ म्हणून निवड झाली असून, तो आता जागतिक स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. राष्ट्रीय स्पर्धेतील अव्वल स्पर्धकांना बंगळुरू येथे विशेष प्रशिक्षण देण्यात आले होते. त्यानंतर झालेल्या अंतिम परीक्षांमध्ये हर्षने उत्कृष्ट कामगिरी करीत देशात प्रथम क्रमांक पटकावला. यापूर्वी त्याने राज्यस्तरीय तसेच ‘वेस्ट झोन’ प्रादेशिक स्पर्धांमध्ये सुवर्णपदक मिळवले होते. तसेच राष्ट्रीय स्पर्धेत कांस्यपदक पटकावत त्याने आपले कौशल्य सिद्ध केले होते. हर्षच्या यशामागे नाशिक येथील प्राचार्या माधवी पगारिया, अभिजित नेवे यांच्यासह शिक्षकांचे मार्गदर्शन लाभले. त्याच्या या यशाबद्दल सोनांबे गावासह शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातून अभिनंदन करण्यात येत आहे.