नागपूर : महाराष्ट्र राज्य वारकरी मंचतर्फे शारदानगर येथील शारदा माता मंदिरात वर्ग पहिली ते नववीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी वारकरी आधात्मिक बाल संस्कार शिबिराचा उद्घाटन सोहळा पार पडला. मुलांना शिबिरात भागवत गीतेतील श्लोक, आरती संग्रह व त्यांचा अर्थ, हनुमान चालीसा पठण, रामरक्षा स्तोत्र, वारकरी पाऊली यांच्यासह विविध शारीरिक व बौद्धिक खेळांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. विद्यार्थ्यांच्या शारीरिक सुदृढतेसह आत्मसंरक्षणासाठी लाठी-काठीचे प्रशिक्षणही दिले जात जाईल, अशी माहिती वारकरी मंचचे नागपूर जिल्हाध्यक्ष मयूर वाजगे यांनी दिली. हे शिबिर २२ मेपर्यंत सुरू राहणार असून यंदाचे चौथे वर्ष आहे. शिबिरात दिनेश कांबळे, शशांक भुरे, तन्वी भेंडे, मनीष ठवकर, अमेय कुलकर्णी, गौरव शिंदे, गिरीश डोये, रुद्र बोंदरे, लवेश वर्मा, श्रावणी कोल आदी प्रशिक्षक विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमात उपमहापौर लीला हाथीबेड आणि कमल हाथीबेड यांचे सहकार्य लाभले आहे.





