‘खेळात असेघडू शकते’

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

आयपीएल सामन्यांमध्ये अंतिम टप्प्यात तणाव वाढतो. अनेकदा खेळाडूंकडून आक्षेपार्ह वर्तन होते. विराट कोहलीने ट्रेव्हिस हेडशी हस्तांदोलन केले नाही. मात्र, सुनील गावसकर यांनी याला जास्त महत्त्व दिले नाही. खेळात तणावाखाली असे घडू शकते, असे त्यांचे मत आहे. सामन्यांमधील चुरस आणि अनपेक्षित निकाल यावरही त्यांनी भाष्य केले.

pressure in ipl sunil gavaskars important thoughts

मुंबई : ‘सामन्यात तणाव असताना मैदानात काही गोष्टी घडू शकतात,’ अशी प्रतिक्रिया भारतीय संघाचे माजी कर्णधार सुनील गावसकर यांनी व्यक्त केली.

आयपीएल टी-२० क्रिकेटमध्ये अंतिम टप्प्यात कमालीची चुरस निर्माण होते. अनेक अनपेक्षित निकाल लागतात. त्यातच खेळाडूंकडून काही वेळा आक्षेपार्ह वर्तणूकही होत आहे. वाद-विवादही होतात. त्यावर गावसकरांनी भाष्य केले. विराट कोहलीने ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ट्रेव्हिस हेड याच्यासह सनरायझर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यातील सामन्यानंतर हस्तांदोलन करण्यास नकार दिला. मात्र, गावसकरांनी याला जास्त महत्त्व देणे टाळले.