काम आटोपून घरी परतणाऱ्या टाइल्स कामगाराच्या दुचाकीला भरधाव कारने पाठीमागून धडक दिली. हा अपघात ११ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास जालना रस्त्यावरील एका हार्डवेअर दुकाना समोर घडली.
गोकुळरामजी चव्हाण (वय ४९, रा. रेणुकानगर, गारखेडा परिसर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, चव्हाण हे टाइल्स बसवण्याचे काम करतात. ११ मे रोजी दुपारी शेंद्रा येथे कामासाठी गेले होते. काम आटोपून ते त्यांच्या दुचाकीने (क्रमांक एमएच २८ एई ४५६०) केंब्रिज चौकमार्गे घराकडे जात होते. जालना रस्त्यावरील एका कारने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. या धडकेत चव्हाण जखमी झाले. या प्रकरणी कारचालकाच्या विरोधात एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार राजू कोतवाल करीत आहेत.






