शहरातून पाच दुचाकी लंपास

महाराष्ट्र टाइम्स

शहरात वाहनचोरीच्या घटनांनी वेग घेतला आहे. विविध भागांतून पाच दुचाकी चोरीला गेल्याची नोंद झाली आहे. एमजीएम रुग्णालय, रेल्वे स्टेशन परिसर, घरांसमोरून आणि बाजारातून या दुचाकी लंपास झाल्या आहेत. सिडको, वेदांतनगर, जवाहरनगर आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलिस तपास करत आहेत.

five motorcycles stolen in the city fear among citizens

शहरातील विविध भागांतून वाहनचोरीच्या घटना सुरू आहेत. रुग्णालय, घर, दुकाने; तसेच विविध भागांतून वाहनचोरीच्या घटना वाढत आहेच. शहराच्या विविध भागांतून तब्बल पाच दुचाकी लंपास झाल्याच्या घटनांची नोंद संंबंधित पोलिस ठाण्यांत घेण्यात आली आहे.

या प्रकरणात रईस साबेर खान (वय ४१, रा. संजयनगर, बायजीपुरा) यांची दुचाकी क्रमांक एमएच २० ईव्ही ६४४३) ही एमजीएम रुग्णालयाच्या गेट क्र. पाचसमोरून चोरण्यात आली. दीपक श्यामराव त्रिभुवन (वय ४५, रा. पृथ्वीराज रेसिडेन्सी, सातारा परिसर) यांची दुचाकी क्रमांक एमएच २० ईएक्स ७९९४ ही रेल्वे स्टेशनच्या रिझर्वेशन कार्यालयाच्या पाठीमागील परिसरातून चोरण्यात आली. देविदास कचरु तरटे (वय ५६, रा. श्रीकृष्णनगर, सहकार बँक कॉलनी, गारखेडा) यांची दुचाकी क्रमांक एमएच २० सीएम ८४४५) ही घरासमोरून चोरून नेली. अन्य एका प्रकरणात कौतिक आनंद घाईट (वय ५१, रा. सावित्रीनगर, चिकलठाणा) यांची दुचाकी क्रमांक एमएच २० डीएक्स ०९२९ ही घरासमोरून चोरली. जम्मू पाशु सय्यद (वय ३८, रा. हिनानगर, चिकलठाणा ) यांची दुचाकी क्रमांक एमएच २० ईएक्स ३६८६ ही चिकलठाणा बाजाराच्या कमानीच्या बाजूला असलेल्या रस्त्यावरून चोरण्यात आली. या वाहनचोरीच्या प्रकरणात सिडको, वेदांतनगर, जवाहरनगर आणि एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.